" श्रीरामपूर शहरासह तालुक्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी "

" श्रीरामपूर शहरासह तालुक्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी "

श्रीरामपूर प्रतिनिधी:

आज दि. २९ जुन २०२३ शहरासह तालुक्यामध्ये ईदुल अजहा (बकरी ईद) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील जामा मस्जिद, रहेमते आलम मस्जिद, जमादार मस्जिदसह विविध मस्जीदांमधून तसेच तालुकाभरातील ईदगाह मैदान आणि विविध मस्जीदांमधून ईदची नमाज पठण करण्यात आली.

प्रामुख्याने शहर काझी मौ.अकबरअली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील संजयनगर परिसरातील इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने ईदची नमाज (पठण) अदा केली.  

यावेळी शुभेच्छा देण्यासाठी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहु कानडे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, बाजार समितीची संचालक सचिन गुजर, ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, सिद्धार्थ मुरकुटे, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साहेब, लकी सेठी, अश्फाक शेख, कमरअली सय्यद, मा. नगरसेवक दिलीप नागरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक कदम आदि उपस्थित होते.

माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फरभाई शेख यांच्या हस्ते इदगाह कमेटीच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मुस्लिम धर्मीयांची बकरी ईद  आणि हिंदू धर्मीयांची आषाढी एकादशी ही दोन्ही सणे एकाच दिवशी आल्याने बंधूभाव व भाईचाऱ्याचे मोठे औचित्य साधले गेले असल्याचे हाजी मुजफ्फरभाई शेख म्हणाले, तसेच आज पवित्र आषाढी एकादशी असल्याने आज कोणीही मुस्लिम बांधवांनी कुर्बानी करु नये असेही ते म्हणाले.

जगात एकता, शांतता, बंधूभाव निर्माण व्हावा, सर्वांनी एकोप्याने रहावे, सर्वांच्या मनोकामना पुर्ण होवोत अशी प्रार्थना मौ.अकबर अली सय्यद यांनी यावेळी केली.

याप्रसंगी इदगाह कमेटी पदाधिकारी, सदस्य व अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. तथा श्रीरामपूर शहर पोलिसांच्यावतीने योग्य आणि चोख बंदोबस्त असल्याचे देखील यावेळी दिसून आले.

Reporter Delhi 91 bpslive news : प्रकाश निकाळे, श्रीरामपूर प्रतिनिधी. 

श्रीरामपूर